मम्मी...............आली😖





गरम गरम वाफाळता भात, त्याच्यावर  मस्त गोडं वरण त्यावर साजूक तुपाची धार आणि लिंबाचे चार थेंब .........जोडीला श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी.....कसं छान ताट सजलं होतं...... सणासुदीचा खास बेत !!!!

आता ताव मारायला सुरुवात करणार😋

इतक्यात...........

आणि इतक्यातच...........🤦

मम्मी ssssss शी आली ..........आमचं चिंटूकलं👶

नहीं ssssssssssssssssssssssssssss

काश ये सुननसे पहले मेरे कान झड गये होते......🙉

अरे यावी रे , मी कुठे म्हटलं येऊ नये ; पण आत्ता??

ही कुठली वेळ हा कुठला क्षण.........???

आत्ता कुठे सुखाने घास तोंडात घालणार होते,
नेमकी तेव्हाच यायची होती???

अशी कशी रे कधीही येते ......वेळ नाही काळ नाही😏

माझं एवढं गरम गरम जेवण......दहा मिनिटं थांबली असती तर काय गेलं असत तिचं??

बरं दुसऱ्या कुणाला पाठवावं म्हटलं तर , मम्मी  होत नाही......तूच पाहिजेस 🙃

माझ्या तोंडाकडे बघून कसलं प्रेशर येत कोणास ठाऊक????  कोणाचं काय अन कोणाचं काय🙆

हे असं का होत असेल यावर ना आता मला रिसर्च करावसाच वाटतोय.  इतर वेळेला अगदी सारं शेड्युल प्रमाणे असतं, पण नेमकं आपण काही आवडत्या किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामात शिरावं तर  .........

खूप दिवसांनी जुन्या मैत्रिणीचा फोन यावा....नुकतंच चटकदार  गॉसिपिंग सुरू व्हावं ,आणि.........
मम्मीsssssss आली😩

मस्त मुडने शॉपिंग करायला जावं....आणि शॉपिंग मध्ये बुडायला सुरवात होतेच आहे, इतक्यात मम्मीssssssss आली😩

एखादा सस्पेन्स पिक्चर पोरांच्या दंग्यात जसा बघायला मिळतोय तसा बघावा आणि नेमकं ending ला मोक्याच्या क्षणी............
मम्मी ssssssss आली😩

गावाला निघताना स्टेशन वर वेळेवर पोचतोय की गाडी जाणार याची चिंता करता करता झटपट आवरून बॅगा उचलायला घ्याव्यात आणि ............
मम्मी sssssss आली 😩

एवढंच नाही तर , नवऱ्याशी भांडण ऐन रंगात यावं , कधी नव्हे ते चार जास्तीचे मुद्दे नेमके आठवावेत, शत्रूपक्ष धारातीर्थी पडायच्या मोडमध्ये जायला सुरुवात व्हावी ...... आणि इकडे........
मम्मी sssssssssआली😩

मी म्हणते जेवायला नाही निदान सुखाने भांडायला तरी मिळावं!!

असो,  हे माझ्यासारख्या तमाम आया बायांनी नक्कीच अनुभवलं असणार आहे, भलत्या सलत्या वेळी तिचं येणं.......

नैसर्गिक क्रिया.... 

आपल्या हातात काय आहे??  (काश.... असतं😅) 

आली की सर्व मोह माया बाजूला सारून तिचं स्वागत करायचं एवढंच!!!

येतेस तर ये बाई , मी थांब बोलून थांबणार आहेस थोडीच😎


©️ स्नेहल अखिला अन्वित


फोटो साभार: गुगल

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel