आँखो देखी...........




नर्सरीतल्या मुलांची शाळा सुटते.......टिचरची असिस्टंट सर्वात प्रथम एक मुलाला घेऊन येते आणि त्याच्या आईला सांगते.......

याला ताप चढलाय........याला उद्या पाठवू नका, आराम करू द्या...........

अहो, पण उद्या पोएट्री कॉम्पिटिशन आहे ना???-इति मुलाच्या मातोश्री विथ पडका चेहरा☹️

हो, पण तुमच्या मुलाला बरं नाही ना????- असिस्टंट

सिलेक्शन झालय का याचं????- मातोश्री

तसं काही नाही, आम्ही याला राखीव ठेवलाय आजारी आहे म्हणून- असिस्टंट

मातोश्री फारच पडलेला चेहरा घेऊन आता माझ्या मुलाच्या कॉम्पिटिशनचं काय होणार, मी एवढे कष्ट घेतलेत याच्यावर त्याच काय होणार या विचारात !!!!


दिवस दुसरा.......

मी माझ्या नर्सरीतल्या मुलाला शाळेत सोडलं,आम्हाला

थोडा उशीर झालेला.......समोर त्या कालच्या मातोश्री मुलाला कडेवर घेऊन उभ्या.....👏👏👏👏

(मला अपेक्षित होतंच)

काल आजारी असणाऱ्या तिच्या मुलाला टीचर वर्गात घेत नव्हत्या.........मातोश्री बाई बाहेर घुटमळत बसलेल्या..........विनवणी चाललेली....

मग मी पण जरा घुटमळले म्हटलं पाहूया काय होतंय.....

सगळी मुलं वर्गात गेल्यावर टिचरने त्या बाईला बोलावलं आणि त्या मातोश्रीने टिचरला पटवलं (बहुतेक एव्हढी कॉम्पिटिशन होऊ द्या, मग सोडा हवतर असं काही) आणि मुलगा वर्गात घेतला गेला......

कॉम्पिटिशन मध्ये तीर मारायला.......

इन्फेक्शन पसरवायला, स्वतःच्या जीवाला त्रास करून घ्यायला......क्या बात!!!


शाळेत मिटिंग मध्ये घसा फोडून सांगतात, आजारी मुलांना औषध देऊन पाठवू नका, शाळेच्या कॅलेंडरमध्ये स्पष्ट नमूद केलयं तरीही अट्टाहासाने मुलांना शाळेत पाठवलं जातं.......कधी परीक्षा म्हणून, कधी कॉम्पिटिशन म्हणून, कधी अभ्यास बुडतो म्हणून......

नर्सरीतल्या पिल्लांची पण परवड?????

डॉक्टर लहानच काय तर मोठ्यांना पण सांगतात, सर्दी- खोकला-ताप आल्यावर किमान चार दिवस स्ट्रिक्टली आराम.........

माझी सातवीतली मुलगी सांगते, माझ्या वर्गात पण ताप आलेली मुलं येतात......का तर नोट्स नंतर कोणी देत नाही म्हणून.......

बरं या नोट्स नाहीच मिळाल्या तर जास्तीत जास्त काय होणारे........जीवापेक्षा प्यारा अभ्यास????

आम्हाला तरी आतापर्यंत कधीही या नोट्स प्रकाराने त्रास दिला नाही..........शाळेचा अति बाऊ न करता.....गरजेला किंवा कधी कंटाळा आला म्हणून सुद्धा दांडी मारून......आपल्याला नाही का येत कामावर जायचा कंटाळा कधी????

मग मुलांना एखाद दिवस शाळेत जायचा कंटाळा आला तर काय एवढं!!!!


नर्सरी, ज्युनिअर आणि सिनिअर के जी च्या मुलांना क्लास लावणाऱ्यांबद्दल तर काय बोलायचं......

मी स्वतः पाहिलेत असे महाभाग.........बरेच आहेत.

त्यांना मुलांचा बेस पक्का करायचा असतो मुलांच्या मर्जीविरुद्ध, मुलांना खेळायचं असत आणि यांना क्लासमध्ये दामटवायचं असतं......

विचारलं तर उत्तर अगदी ठरलेलंच असतं कॉम्पिटिशन किती वाढलीये हल्ली.......तरायला नको का?????

आता अभ्यास नाही केला तर पुढे किती महागात पडेल महितीये का????


नाही माहिती आणि माहित करूनही घ्यायचं नाहीये ........

आम्हाला मुलांना त्यांच्या कलेने वाढवायचंय , त्यांना खुंटवायचं नाहीये........जसं आम्ही वाढलो without any कॉम्पिटिशन प्रेशर ...........


पोराला विचारलं होतं, बाब्या पोएम म्हणनार का????

त्याने ठासून नाssही असं सांगितलं.......आमच्यासाठी विषय संपला............


तूम भी खुश, हम भी खुश 😜


©️स्नेहल अखिला अन्वित


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel