मराठी कथा
सणवार
बोंंबला की जरा !!!
बुधवार, २० मार्च, २०१९
होळीचा सुगावा लागताच लहानपणी साताऱ्याला आम्ही पोरं बोंबलायला सुरुवात करायचो.
आमचा साऱ्या मित्रमैत्रिंणीचा खेळ एकच जोरजोरात बोंबा मारणे. आss वावss वावss वाss वा ssss वाsss
घरी सतत ओरडा मिळायचा; अरे अजून वेळ आहे रे थांबा, आतापासून नका बोंबलू. भरल्या घरात असं बोंबलणं चांगलं नसतं.
होळीच्या दिवशी बोंबला हवं तेवढं.......नका रे ताप देऊ आतापासून😟
पण धीर धरतील ती पोरं कसली........
आम्हाला ना पुरणपोळीचा आकर्षण ना पेटणाऱ्या होळीचं........
आम्हाला आकर्षण फक्त तोंडावर पालथी मूठ ठेऊन किंवा हाताने तोंडावर चपट्या मारून बोंबलायचं......
होळीच्या दिवशी सुद्धा उठलं की पाटावर बसून पाहिल्यांदी काम करायचो ते बोंबा मारायचंच........
मला आठवतं घरचे सुद्धा कौतुक करायचे आणि आम्ही त्या कौतुकाने हुरळून जोरजोरात बोंबट्या मारून त्यांचे कान किटवायचो.
आणि ते सारे होळीच्या दिवशी बोंबललेलं चांगलं असतं, शुभ असतं, म्हणून आम्हाला हवं तेवढं बोंबलू द्यायचे.
कसली मज्जा!!!
खरं तर होळी पेटल्यावर ठणाणा बोंबलायचा कार्यक्रम असतो, पण आम्हा मुलांसाठी मात्र होळीच्या अगोदर चार पाच दिवसापासून जो बोंबाबोंबीचा खेळ सुरू व्हायचा ते होळी गेल्यावर तेवढाच जोराने सुरू ठेवल्याने दणादण रट्टे खाल्ल्यावरच संपायचा.
आजही होळी आली की सर्वप्रथम आठवतात त्या बोंबाच!!!
आणि बोंंबलायच्या निमित्ताने लुटलेली मज्जाच मज्जा!!!!
म्हणूनच जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी आज दोन्ही पोरांना म्हटलं; चला बोंबा मारुया.........
तर माझ्याकडे आ वासून बघू लागले.....
पोराला बोंबा शब्द इंटरेस्टिंग वाटल्याने तो म्हणाला, चल मारुया....... काय करायचं ?????
मग मी त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवलं तर लहानगा फारच एक्साईट झाला आणि थोड्याश्या प्रयत्नांनंतर चांगलंच आणि नॉनस्टॉप बोंबलू लागला.
बाहेर खेळायला गेल्यावर दोघांनीही आपली एक्साईटमेंट आपल्या मित्रमंडळाच्यात पास केली आणि त्या साऱ्यांनी जो सकाळी बोंबलण्याचा कार्यक्रम सुरू केलाय तो अजूनही जोशात सुरू आहे........
लय म्हणाल तर लय भारीच वाटायलयं मला या साऱ्यांना बोंबलायला लावून.....
माझ्या बालपणीच्या आठवणी यांच्याकडून जाग्या करून घेतलेल्या पाहून........
आत्ता वाटतंय होळी आहे नाहीतर बिन बोंबलायची कसली ती होळी.........
तुम्ही घेतलाय का आनंद मनसोक्त बोंबलण्याचा.......होळीचा आनंद लुटलाय का घसा फोडेपर्यंत बोंबलून........
तुम्ही घेतलाय का आनंद मनसोक्त बोंबलण्याचा.......होळीचा आनंद लुटलाय का घसा फोडेपर्यंत बोंबलून........
गावपण शहरात आणलं तर चालतं बरं का😉
Previous article
Next article
