तसं आम्हाला मराठीच बोलायचं असतं........!!


आज घरात एकाही इंग्रजी शब्दाचे उच्चारण निषिद्ध आहे, मराठी भाषा दिन आहे आज, आपण साजरा करायचा कळलं😊

आलं हिच्या अंगात ......नवरोबा😏

मम्मी, निषिद्ध म्हणजे काय??

मम्मी नाही आई म्हण😡

अगं पण मी 'आई' तर दोन्ही आज्यांना म्हणते ना. ....तूच तर सांगितलंस ना, त्यांना आजी बोलून ओल्ड फिलिंग यायला नको म्हणून......

मग दुसरं काही म्हण😲

चल मातोश्री म्हणते तुला संभाजीराजेंच्या मालिकेत  म्हणतात तसं.......

बाबू आता मम्मीला 'मातोश्री' म्हणायचं ह😛

मातूशी मातूशी👦

बरं मातोश्री आता सांग🙂

निषिद्ध म्हणचे मनाई!!

मनाई म्हणजे??

बंदी.......एकही इंग्रजी शब्द बोलायचा नाही कळलं !! फक्त मराठीतून वार्तालाप करायचा.

वार्तालाप म्हणजे??

फक्त मराठीतून एकमेकांशी सवांद साधायचा.

बरं आता मला चहाबरोबर बिस्कीट हवंय, बिस्कीटाला काय बोलू मराठीत??

????🤔

अहो, सांगा ना हो मातोश्री......

नाही माहीत मला..... त्या माहितीच्या जंजाळात शोध भ्रमणध्वनीवर......

काय बाई, किती विचार करावा लागतोय बोलताना 🙆

आपण रोजच फक्त मराठीतून वार्तालाप करू म्हणजे तू असंच विचार करून करून आरामात बोलशील- नवरोबा😜

मातोश्री, काहीच मराठी शब्द येत नाहीये त्यात बिस्कीटाला🙄

मग जाऊ दे😐

जाऊ दे कसं इंग्रजीला मनाई आहे ना आज??

गप खा मुकाट्याने😠

मातोश्री आता मला शाम्पू हवाय काय बोलू??

काsही बोलू नकोस, घे आणि घाल डोसक्यावर

चला मी निघतो.....🚶

बाय बाय पिताश्री

बाय बाय ला काय म्हणू, मातोश्री??

टाटा मराठी शब्द आहे का ग??

मग टाटा ला काय म्हणू आता?

काही म्हणू नका, फक्त मूक हात हलवा🤚

आज मूक दिन साजरा करतोय असंच वाटतय नाही??😂

गप बस जरा🤦

मातूशी माझ्याशी बॅट बॉल खेळ ना👦

चेंडू फळी बोलायचं हा राजा😊

नाही बॅट बॉलच बोलतात त्याला😲

चेंडू फळी पण बोलतात😊

नाही बॅट बॉलच म्हणजे बॅट बॉलच☝️

जाऊ दे😌

मातोश्री माझा टाय सापडत नाही टाय ला काय बोलू ?आणि रिबिनीला काय बोलू?
रिबीनच बोलतात का ग मराठीत पण??
सांग ना???

नाही माहीत शोधून सांगते🤔

अगं पण तू शोधून सांगे पर्यंत उद्या उजडेल ना, मग आजच्या दिवसाचं काय??

गप्प बस. चल आवर फास्ट फास्ट....ओह सॉरी ....नाही नाही ...माफ कर आवर लवकर लवकर

आज टिफिनला सॉरी सॉरी .....माफ करा हा मातोश्री
डब्याला काय आहे??

पांढरे चोकोनी मऊ मऊ तुकडे आणि त्यावर फळांचा गोड लगदा

म्हणजे?🙃

ओsहह हा तर ब्रेड दिसतोय आणि जॅम का??

अगं मला तर वाटलं आज खास मराठी पदार्थ असेल थलिपीठ वगैरे😉

असं कर आज पुरणपोळीचा बेत कर मराठी दिनानिमित्त!!
मस्त साजरा करू....त्याच्या जोडीला मसालेभात चालेल.
शाळेतून आल्यावर भरपूर ताव मारून खाईन मी😋
संध्याकाळी गरमागरम कांदेभजी......

अगं काय भस्म्या झालाय की काय तुला??😱
जा गप निघ........

मी निघते, पण बुटाला पॉलिश करायचंय मला.....
कसं म्हणू??  बुटाला एक्झाक्टली काय म्हणतात ग मराठीत आणि पॉलिशला?

जा ग बाई जा..... शाळेत जा एकदाची🤦

अगं हे काय? फक्त मराठीतूच बोलायचंय म्हणतेस म्हणून विचारतेय ना? तुला सपोर्ट; सॉरी नाही नाही माफ कर, काय ते पाठींबा देतीये ना मी भरभरून👍

जा तू आता भणभणायला लागलायं मला 🙆

बर मग शाळेतून आल्यावर हं😜

नको बास झालं......एवढ्या वेळ केलं तेवढं सेलिब्रेशन .... शी बाई तोंडात तेच बसलंय......
सॉss नाही नाही, माफ कर.....दिवस साजरा करणं खूप झालं😊

दमले मी 🤦

आता पुढच्या वर्षी बघू 🙃

सध्यासाठी फेसबुक वरून (काय म्हणतात मराठीत याला, राहू दे ) सर्वांना शुभेच्छा देऊ, त्याशिवाय काय दिन साजरा केल्यासारखं वाटणार नाही........

मराठी बोली मराठी बाणा
जय मराठी भाषा दिवस✌️

इंग्रजी वजा मराठी बोलताना माझी तर नुसती भंबेरी उडाली, त्या इंग्रजीने नकळत किती आक्रमण केलंय आपल्याच मातृभाषेवर??
एक सरळ वाक्य मराठीतून बोलणं मुश्किल होऊन बसलंय.......

तुम्हाला तरी जमतं का हो? की तुम्ही पण नुसत्या शुभेच्छाच देता माझ्यासारख्या ??😛

कठिण करून ठेवलंय बरं आपणच सारं!!!

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel