आंटी मत कहो ना 😜😜😜


             

मी दहावीत असताना खूप फेमस सिरीयल लागायची; हम पांच.......त्यात त्या पाच मुली त्यांच्या बऱ्यापैकी तरुण शेजारणीला आंटी म्हणायच्या..... आणि ती मग उफाळून उठायची.......ऊंssss .......आंटी मत कहो ना.......
त्यावेळेस खूप हसू यायचं त्या डायलॉगचं......आणि आता ........आता मलाच तो डायलॉग मारावा लागतोय येता जाता 🙆

आंटी मत कहो ना.............!!!😉😉😉

आंटी बोलण्यावर माझा आक्षेप मुळीच नाही, पण कोणी बोलावं यावर नक्कीच आहे.......
हे कोणी म्हणजे आपल्यापेक्षा अगदी 8-10 वर्षाने लहान असलेले किंवा कधी कधी त्याहून कमीही........
(खरं सांगायचं तर बरेचवेळा तेच बाजूला उभे केले तर आंटी अंकल शोभतील, असे अवाढव्य असतात)

लहानपणी मी माझ्या आई, मावशी, मामा बरोबर फिरायला जायचे तेव्हा भाजीवाले, दुकानदार किंवा कुठलेही विक्रेते त्यांना ताई, वहिनी, दादा म्हणायचे......
आणि आता हेच सारे आंटी अंकल वर आलेत.........वय काहीही असुदे, लग्न झालेलं असेल आणि त्याहून  पोरगं बाजूला असेल ........... तर आंटी शिवाय बात नाही.......
दुकानतले सेल्समन आणि भाजीवाले जास्तच खोडसाळ असतात.......मला तर वाटत मुद्दामच करतात ते.....
मी तर अश्या दिड शहाण्यांना सरळ हटकतेच....... आंटी.....???? कौनसे अँगलसे में आपकी आंटी लग राही हूं......आपकी मम्मी- मासी क्या मेरे जितनी हैं?????
कारण हा आंटी बोलणारा टारगट माझ्या एवढा कधी माझ्यापेक्षा मोठाही असतो😡
खरं तर या लोकांनी कोणी का येईना, किती का वय असेना,  किमान बायकांना तरी ताई - वहिनी केलं पाहिजे ......अर्धा डाव जिंकल्यासारखंच ......... ..
वेलकमलाच आंटी बोलून डोकं फिरवतात .......
हाss बोलो आंटी क्या चाहीये????

नवरा म्हणतो.....काय एवढं मनाला लावून घेतेस????
हो हो...... तुला ठिक आहे रे बोलायला  ..........तसही तुम्ही पुरुष काय, काहीच मनाला लावून घेत नाही.......
आमचं तसं नसतं ना!!!

आणि असं कसं मनाला लावून नाही घ्यायचं????

कबूल!!! मी माझ्या पोरांच्या वयाच्या किंवा ठीक आहे इकडे तिकडे पाच दहा वर्षे मोठ्याची (जड मनाने का होईना) आंटी  होऊ शकते.........पण दुसऱ्याला उगाच आंटी अंकल करून स्वतःला आजन्म कॉलेज कुमार अथवा कुमारी समजणाऱ्यांची आंटी नक्कीच नाही ना????😏

कधी कधी तर याहून वरताण म्हणजे तिशी उलटून गेलेल्या  पण लग्न न झालेल्या किंवा न केलेल्या स्वतःला बेबी समजून आम्हाला आंटी म्हणून हाक मारतात तेव्हा हसावं की रडावं हेच कळत नाही.......मला तर खरं त्या बेबीच्या झिंज्याच उपटाव्या वाटतात........how dare u to say me आंटी????? M I looking like ur आंटी????😎

 आता बघा , करिनाला अनुष्काने आंटी म्हटलं तर कसा तिळपापड होईल तिचा; नाही का????
तिला तर आलियानेही आंटी म्हटलेलं चालणार नाही.....😝
तिच्याच वयोगटातल्या आम्हाला मात्र अनुष्का, दिपिका एवढ्या बेब्या  आंटी करून टाकतात, भले नसू आम्ही करिनासारखे चमकदार, बांधेसूद.....म्हणून काय   लगेच तुमच्या आंटी झालो का????

आमच्या वाढत्या वयाची जाणीव आहे आम्हाला, ते साजरं करतच असतो आम्ही........जगू द्या की आम्हाला आमच्या वयात........
मज्जा येते काय , आम्हाला उगाच ओल्ड फिलवून.......

तुमचा ही नंबर येणारेच आहे की बेब्यांनो.....

नाक मुरडत म्हणत बसाल मग तुम्ही पण.......

ऊंss...... आंटी मत कहो ना😜😜😜

©️स्नेहल अखिला अन्वित


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel