हसले आधी कुणी......???




बस्स......यापुढे एक शब्दही बोलू नकोस😡

हुंंss.....कोणाला हौस आहे.....नको त्यांच्याशी बोलायची........गेला उडत.....😏

मग तू पण गेली उडत......😏😏

फुर्रsssss🤙

तू पण फुर्रररsssssssss🤙🤙

एवढ्या बाचाबाची नंतर फक्त कसाबसा पाच मिनिटे घरात सन्नाटा......😷

मग सुरू होतो खेळ.......

हसले आधी कुणीचा.........

मनातली सगळी भडास काढून मन अगदी नितळ पाण्यासारखं  झालेलं असतं; दोघांचंही......

आणि उगीच नको त्याच्यावर प्रेम यायला सुरुवात होते........😜

मग बघायचं समोरची पार्टी स्वतःहून येतेय का ते.....चोरी चोरी चुपके चुपके नजरा नजरी  (same as लाईनमारुगिरी)

समोरच्या पार्टीची फिलिंग काही वेगळी नसतेच.......यापेक्षा तिची पटर पटर बरी......बोल बये बोल......थोडा वेळ बघतो नाहीतर........

निरोप पास करणाऱ्या पोरांची नुसती धम्माल........कधी या खोलीत कधी त्या.......त्यांना फुकटची एक्साइटमेंट👫

चांगलीच नजर ठेवून असतात प्रत्येक हालचालीवर.......जरा आपलं बेअरिंग निसटलं तर नाचत जाऊन सांगतील लगेच, टपलेलं आहेच मग कोणीतरी........

तासभर तरी बोलूच नका मम्मी-पप्पा.......आम्हाला धम्माल येतीये!!! 🙃🙃🙃  कट्टी फू चा डाव रंगू दे जरा......डांबरट पोरं👨👩

समोर जायचंच नाही.......नाहीतर......हसी तो फसी होतं उगाच...... कळ काढुया थोड्यावेळ......

आपण आपलं स्वयंपाकघरातच रहावं......

अरे ...उदयाला कांदे नाहीत भाजीला.....कोणाला सांगू आता.....बोलावं का?🤔

दूध पण संपलेलं दिसतंय........मारू का हाक??🤔

बयेने जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय........

चला आपणच जावं, लुडबुड करून बघूया जरा तिच्या आजूबाजूला....... भाव दिला तर दिला😉

माना जनाबने पुकारा नहीssssssss

क्या मेरा साथ भी गंवारा नहीssssss

बेसुरा कुठला.........हसवणार आता मला....कंट्रोल पण होईना..........विकेट जाणार माझी आता🙆

बयेचा गंभीर चेहरा बघूनच हसू फुटतंय.... काय आव आणलाय.....आतमध्ये तर उकळ्या फुटतयात.....

ओहsss कशाला पाहिलं मी ......झालीच शेवटी नजरानजर......

हसली.... हसली...... हसली

चल....... तूच हसलास 

तू ❤️

तूच ❤️❤️

तू ......तू.....तू.......💕💕💕

💑 💏 💑

भांडणा जरुरी है.......ब्रेकअप करायला नाही हं..... मुरलेल्या नात्याने गोडवा वाढवलाय की आंबटपणा याचा चेकअप करायला........आणि मग जरुरीप्रमाणे त्याचा दिर्घकाळ टिकेल असा मेकअप करायला........

परस्परांवरी रुसता फुगता 

जवळ येऊनी दूरची सरता

हसले आधी कुणी ??

तू का  मी ??  तू का मी ???

तुला बघून मी.........मला बघून तू......आपल्याला बघून पोरं

घर सारे हसले रे........😀


©️स्नेहल अखिला अन्वित

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel