मराठी कथा
विनोदी
आम्ही हसतो गडगडाटी !!
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
कुठलाही फुटकळ जोक झाला, छोटी-मोठी गमंत घडली तरी आम्हाला गालातल्या गालात हसून सोडून देणं, किंवा नाजूकपणे खीsखीsखुsखुs करणं काही जमत नाही आणि या जन्मात जमेल असं वाटतही नाही.
आमचं हसणं म्हणजे समोरचा नाजूकदिल असेल तर हादरलाच पाहिजे असं!!
आमचं म्हणजे, मी , माझी मुलगी आणि आता मुलगाही आमच्या गॅंग मध्ये जॉईन झालाय, नवरा झेपेल तसा येऊन जाऊन असतो.
दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. टिव्हीवर "स्त्री" पिक्चर लागलेला. असा मी तो पाहिलाही नसता, पण मैत्रिणीने तारीफ केलेली म्हणून घरच्यांना पण बघायला बसवलं,
आणि जे हास्याचे फवारे उडायला लागले की बस रे बस!!
आणि जे हास्याचे फवारे उडायला लागले की बस रे बस!!
पोट दुःखेपर्यंत, डोळ्यातून धारा वाहेपर्यंत, गडाबडा लोळून आमचं घर गडगडत होतं.
नुसतं हाहा हाहा हाहा हाहा हाहाassssss अन् हाहा हाहा हाहा हाहा हाहाassssss 😂🤣😂
इतकं झालं की आमच्या बरोब्बर वरती राहणारे आले आमचा हालहवाल जाणून घ्यायला!!
आता आम्ही थिएटरही गदागदा हलवणारी माणसं, घर काय आपलंच आहे!!
कॉलेजमध्ये मैत्रिणींबरोबर फिरताना सौंदर्यासाठी नाही, पण हसण्याच्या गडगडाटामुळे मुड मुड के देखनेवालोंकी काही कमी नव्हती. तशी अजुनही नाही, पण तेव्हा जरा नजरेत हलकासा प्रेमभाव जाणवल्यासारखं वाटायचं आणि आता काय मेली दात विचकतीये, असं काहीसं असतं.😏
एकदा सुरू झाल्यावर नॉनस्टॉप सुरूच राहायचा रोगही आहे आम्हाला, घडलेली हास्यपरिस्थिती संपुष्टात आल्यावर देखील मला आणि मुलीला तर एकमेकांच्या नुसतं तोंडाकडे बघूनही आठवून आठवून कितीतरी वेळ हसायला येतं.
हल्लीच मी कुठेतरी वाचलं, हसणं आवरत नसेल तर स्वतःला एक चिमकुटा काढावा. तो तर काढतोच, पण कितीही जोरात काढला तरी आमचं नॉनस्टॉप हसणं थांबवण्यासाठी आमच्याकडे नवऱ्याला जमदग्नीचा अवतारच धारण करावा लागतो.
कालच नवीन कळलं, माझ्या मुलीच्या मैत्रिणीची म्हणे ट्रिटमेंट चालू आहे, हसणं आवरत नाही म्हणून. गोळ्या दिल्यात तिला, हसणं कंट्रोल झालं नाही तर तोंडात टाकून चोखत बसायचं ....ऐकावं ते एकेक नवलच बाई😱
मला तर वाटतं हसणं काय किंवा रडणं काय आवरून धरायची गोष्टच नाही!!
होता येईल तेवढं मोकळं व्हावं. हसण्यातूनही आणि रडण्यातूनही!!
चिक्कार हसलं की सुद्धा मस्त वाटतं, आणि भरपूर रडलं की सुद्धा बरेचदा फ्रेश फिल येतो. एकदाचं सगळं मनात अडकलेलं धुवून जे निघतं!!
काय वाटतं तुम्हाला?? ते जे काय वाटत असेल ते सांगाच; पण तो "स्त्री" पिक्चर बघितला नसेल तर एकदा बघाच, तो कमरिया हिला दे, हिला दे गाणं वाला हो!!
आलं का ध्यानात??
तुम्हाला पोट धरून हसायला लावण्यासाठी, मी आपलं सजेस्ट करायचं काम केलं, बाकी तुमची मर्जी😁
©️ स्नेहल अखिला आन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेंट, फॉलो केलंत तर माझ्याही ओठांवर तुमच्यामुळे हास्य फुलेल, आणि शेअर करताना नावासकट केलंत तर माझ्याबरोबर तुम्हालाही नेहमीच हसवण्याचा प्रयत्न करेन😀
अगदीच काही नाही तर माझ्या या ब्लॉगवर फिरून आलात तरी चालेल😉
Previous article
Next article
