मराठी कथा
सामाजिक
आजही तिने नेहमीसारखा दिवस सुरू केला, आवडती प्ले लिस्ट लावली आणि मस्त गुणगुणत काम करू लागली.
नंतर मात्र तिच्या मनात त्या आत्याच्या नातेवाईकाचाच विचार रेंगाळू लागला. आत्याने सांगितलेलं सगळं उगाच डोळ्यासमोर दिसू लागलं.
तिचा पडलेला चेहरा बघून नवरा म्हणाला, काय आज परत उठल्या उठल्या बातम्या ऐकल्यास की वाचल्यास मोबाईलवर ??
नाही रे मी काही नाही केलं, बातम्याची तर अप्लिकेशन्सच उडवून टाकली आहेत मी मोबाईलवरून, सकाळी व्हाट्सपवर डोकावतही नाही मी.
तिच्यापर्यंत पोचलेल्या काही वाईट बातम्या, तिने उगाच कोणालाही अजिबात कळवल्या नव्हत्या.
कोणाशी बोलताना ती समोरच्याला प्रसन्न वाटेल असंच बोलायची, कधी जोक्स, कधी मनाला उभारी देईल अश्या गोष्टी, जुन्या चांगल्या आठवणी, जे जे काही चांगलं ऐकलय वाचलंय ते ते आवर्जून सांगायची. आणि नको ते जाणीवपूर्वक टाळायची.
Stay Positive........!!
गुरुवार, १६ जुलै, २०२०
दिवसाची सुरुवात छानशी गाणी ऐकून करायची अंतराची रोजची सवय. सकाळी सकाळी उठून आवडती गाणी लावली की तिला दिवसभर फ्रेश वाटायचं. कधी भजनं ऐकायची, कधी प्रेमगीतं, कधी क्लासिकल, कधी चक्क कोळीगीत तर कधी धिंनचाक थिरकायला लावणारी गाणी, जसा ज्या दिवशी मूड असेल तसं असायचं सारं.......
आजही तिने नेहमीसारखा दिवस सुरू केला, आवडती प्ले लिस्ट लावली आणि मस्त गुणगुणत काम करू लागली.
जेमतेम दहा मिनिटं होतायत न होतायत तोपर्यंत तिचा मोबाईल वाजला. एवढ्या सकाळी कोणाचा फोन म्हणून बघितलं तर तिच्या आत्याचं नाव दिसलं. घेऊ का नको करत करत शेवटी तिने घेतलाच.
दोन तीन मिनिटं इकडचं तिकडचं बोलल्यावर आत्याने तिच्या सासरचा एक दूरचा नातेवाईक कसा मरणाच्या दारात उभा आहे, याबद्दल इथंबूत बातमी पुरवली. अंतरा विषय बदलू पाहत होती, पण आत्या राहून राहून तिथेच येत होती. तिला सर्व सांगायचंच होतं. कसंबसं ऐकून बाकीचं जुजबी बोलून तिने फोन ठेवला.
नंतर मात्र तिच्या मनात त्या आत्याच्या नातेवाईकाचाच विचार रेंगाळू लागला. आत्याने सांगितलेलं सगळं उगाच डोळ्यासमोर दिसू लागलं.
गाणी सुरू होती, पण तिचं मन त्या माणसाभोवतीच फिरत बसलं. कशात लक्ष लागेना.
कुठून तो फोन उचलला असं तिला झालं. ह्या आत्याला तरी का उगाच ज्या माणसाला मी कधी भेटली नाही ना बघितलं, ना अगोदर हिच्या तोंडून त्याचं नाव ऐकलं अशाबद्दल मला सविस्तर सांगावं वाटलं कुणास ठाऊक?? सध्या काय चालू आहे, माणूस जसातसा सावरतेय स्वतःला, आणि या असल्या बातम्या का द्याव्याश्या वाटतात लोकांना?? त्यातून काहीही संबंध नसलेल्या माणसाला??
नको ते घुसलं डोक्यात आता दिवसभर तेच, झोपतानाही तेच असणार........
तिचा पडलेला चेहरा बघून नवरा म्हणाला, काय आज परत उठल्या उठल्या बातम्या ऐकल्यास की वाचल्यास मोबाईलवर ??
बारा का वाजलेत तोंडावर? किती वेळ सांगितलं तुला नको ते नको पाहू, नको ऐकू, त्रास होतो ना मग असा??
नाही रे मी काही नाही केलं, बातम्याची तर अप्लिकेशन्सच उडवून टाकली आहेत मी मोबाईलवरून, सकाळी व्हाट्सपवर डोकावतही नाही मी.
पण बघ ना कशी माणसं असतात, खास फोन करून वाईट बातम्या देतात. घेणं देणं नसलेल्या माणसालाही.
जवळचा संबंध असेल तर अपरिहार्य आहे, मी समजू शकते, पण गरज नाही तिथे नको ते का पसरवावं??
चार चांगल्या गोष्टी बोला, काही वाईट कळलं असेल तरी त्या माणसाला बातमी पोचवणं तेवढं गरजेचं नसेल तर सोडून द्या. सिच्युएशन बघून वागावं ना!!
अंतरा हळव्या मनाची होती, जरा काही असं कानावर पडलं तर तिचं मन घाबरं घाबरं व्हायचं. त्यात हल्लीचं वातावरण भर घालायचं. त्यामुळे शक्य तितकं ती नेगेटिविटीपासून दूर राहायचा प्रयत्न करायची. स्वतःचं मन इतर चांगल्या गोष्टीत रमवायचा प्रयत्न करायची.
तिच्यापर्यंत पोचलेल्या काही वाईट बातम्या, तिने उगाच कोणालाही अजिबात कळवल्या नव्हत्या.
तिला वाटायचं नंतर कोणी काही बोललं तर खाऊ ओरडा, पण या काळात नकोच काही गरज नसताना मुद्दाम सांगायला...........
कोणाशी बोलताना ती समोरच्याला प्रसन्न वाटेल असंच बोलायची, कधी जोक्स, कधी मनाला उभारी देईल अश्या गोष्टी, जुन्या चांगल्या आठवणी, जे जे काही चांगलं ऐकलय वाचलंय ते ते आवर्जून सांगायची. आणि नको ते जाणीवपूर्वक टाळायची.
पण सगळे नाही ना असा विचार करणारे असतात. तो दिवस आणि पुढचे काही दिवस अंतराचं मन अस्वस्थच राहील. तिच्याशी काही देणंघेणं नसलेली बातमी गरज नसताना तिच्यापर्यंत पोचवली गेल्यामुळे..........
खरंच विचार करावा सर्वांंनीच, नको त्या बातम्या उगाच पुढे करताना. कुणाच्या शेवटच्या क्षणांचे फोटो, स्मशानभूमीतले फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड करताना. खरंच गरज असते का याची? कुणाला छान वाटतं असं काही बघून?
तुम्हाला आलं, ठिक आहे, तुम्ही ठेवा, डिलीट करा, फॉरवर्ड कशाला??
उगाच बिनगरजेच्या वाईट बातम्या पोचवणाऱ्यांना ब्लॉक करा हवं तर काही काळासाठी, पुढे काय पाठवायचं आणि काय नाही ते कळण्याइतपत शहाणे सगळेच आहेत, उगाच अतिशहाणे बनून कुणाला दुखवू नका........
आनंद घ्या, आनंद वाटा........
©️ स्नेहल अखिला अन्वित
लेख आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा.........
Previous article
Next article