कौटुंबिक
मराठी कथा
सामाजिक
स्त्रीवादी
म्हणत नाहीस, पण नको असेल तेव्हा झिडकारतोस ना? सगळं तुझ्या मर्जीने असतं तुझं!! दुसऱ्याच्या मर्जीचा विचार तरी येतो का रे हर्ष, कधी तुझ्या मनात?
ऑफिसला जाताना नीट पोटभर खावं हे काय माहीत नाही तुला? पण तू गडबडीत अर्धवट टाकून उठतोस. ते बघून मला कसंनुसं होतं, म्हणून मी तुझ्या पाठी लागते, तर तू माझ्यावर डाफरतोस.
वेळेवर डबा खावा म्हणून तुला फोन करते तर, तुला कधी कधी 'हो' हा एक शब्द बोलायला जड जातो. कधी तर माझा फोन उचलायलाही जड जातं.
बाहेरच्यावर जास्त विश्वास ठेवू नको, त्यापेक्षा घरच्या, जवळच्या लोकांना जप, त्यांना वेळ दे म्हटलं, तर आलीये मोठी शहाणपणा शिकवणारी, म्हणत तू हिणवतोस.
स्मोकिंग सोड, ड्रिंकिंग सोड, फास्ट ड्रायव्हिंग सोड, मोबाईलचं ऍडिक्शन सोड, का सांगू मी तुला सारखं सारखं?
ऍक्चुली काय आहे ना, तू तुझ्याकडेच बघत होतास फक्त आणि मी मूर्खही तुझ्याकडेच बघत होते फक्त.
माझा विचार करत असतास तर वाटलं असतं ना? मी होते अशीच, तुला डिवोटेड बनून बसलेली. तुझ्या एका हाकेला कायम धावणारी..........
म्हणूनच कंटाळले आणि ठरवलं, नवरा तर काही केल्या सुधारणार नाही, आपणच सुधारूया. काढून टाकूया त्याच्यावरचा जीव आपला, म्हणजे सर्व आपोआप कमी होईल. नको घेऊया त्याच्या कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट एवढा, की आपलं स्वतःचच महत्व कमी होईल.
जमतंय का बघ. खूप अवघड आहे स्वतःचं सोडून, दुसऱ्याचं मन जपणं, कठीण जाईल तुला. जमवलंस तर ठिक, नाहीतर मी पकडला आहेच रस्ता सुधारण्याचा, मनात आणलं तर कधीही चालू पडेन मी, एकदाही मागे वळून न बघता. मग नंतर कितीही पस्तावलास तरी दुसरा चान्स नसेल, एवढं पक्कं लक्षात ठेव..........
सुधारली बायको.......!!
मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०
बरेच दिवस बघतोय अंकिता, तू काहीतरी विचित्रच वागतीयेस. काय झालंय तुला?
कुठे काय हर्ष? मी तर तशीच आहे.
कुठे तशीच आहेस? हल्ली तुझं लक्षच नसतं माझ्याकडे. आठवडा झाला बघतोय, एकही सूचना देत नाहीयेस तू मला? नाहीतर सकाळी उठल्यासपासून तुझी भुणभुण असायची माझ्यामागे. आता अगदी जेवढ्यास तेवढं बोलतीयेस तू माझ्याशी. बाहेर असल्यावर एकही फोन नसतो तुझा हल्ली?
वा!! म्हणजे बरं आहे, बायको बोलली तरी तुम्हाला त्रास आणि नाही बोलली तरी त्रास.
तसं नाही ग. बोलावी पण सतत बोलत बसू नये, एखाद्या गोष्टीवरून सारखं सारखं मागे लागू नये.
हं, म्हणजे तुला वाटेल तेव्हा आणि तुला हवं तेच बोलावं. आणि तुझा मूड बघून, हो ना?
असं कुठे म्हटलं मी, अंकिता?
म्हणत नाहीस, पण नको असेल तेव्हा झिडकारतोस ना? सगळं तुझ्या मर्जीने असतं तुझं!! दुसऱ्याच्या मर्जीचा विचार तरी येतो का रे हर्ष, कधी तुझ्या मनात?
खरं सांगू, मलाच कंटाळा आला आता तुझ्या मागे लागण्याचा. म्हटलं जाऊ दे करु दे, काय करायचंय ते. आपला जीव कशाला जाळा, आपली किंमत नाही तिथे.
एवढं लगेच टोकाला कशाला जाते ग??
मग काय सतत तुझं हडतुड करणं सहन करत बसू का? तुझं तुला कळतं की सगळं, लहान नाही तू. मीच वेडी होते, जे तुला उगाच काही ना काही सांगत होते.
ऑफिसला जाताना नीट पोटभर खावं हे काय माहीत नाही तुला? पण तू गडबडीत अर्धवट टाकून उठतोस. ते बघून मला कसंनुसं होतं, म्हणून मी तुझ्या पाठी लागते, तर तू माझ्यावर डाफरतोस.
कोणी सांगितलंय मला, स्वतःचा इन्सल्ट करून घ्यायला. जाऊ दे तिकडं, कळतं की सारंकही तुला.
वेळेवर डबा खावा म्हणून तुला फोन करते तर, तुला कधी कधी 'हो' हा एक शब्द बोलायला जड जातो. कधी तर माझा फोन उचलायलाही जड जातं.
हट्, कोणी सांगितलंय मला, असले स्वतःला पाडून घेण्याचे उद्योग करायला. तसं तुला तर कळतंच की सगळं.......
बाहेरच्यावर जास्त विश्वास ठेवू नको, त्यापेक्षा घरच्या, जवळच्या लोकांना जप, त्यांना वेळ दे म्हटलं, तर आलीये मोठी शहाणपणा शिकवणारी, म्हणत तू हिणवतोस.
सोड काय पडलंय मला, ठोकर खाशील तेव्हा समजेल बरोबर.
तू तर मोsठा शहाणा आहेस, तुला बरंच काही कळतं!!
स्मोकिंग सोड, ड्रिंकिंग सोड, फास्ट ड्रायव्हिंग सोड, मोबाईलचं ऍडिक्शन सोड, का सांगू मी तुला सारखं सारखं?
का मागं लागू तुझ्या हे सोड अन् ते सोड करत?
आणि एवढं सांगून ऐकतोस का तू? इरिटेड होतं तुला बायकोचं अति काळजी करणं!!
बस तिकडं बोंबलत.......कोणी सांगितलंय मला स्वतःच्याच लाईफची पर्वा नसलेल्या माणसासाठी झुरत बसायला!!
तुला काय कळत नाही का तेवढं??
सोडलं मी, सोडलं सगळं. खूप घेतला कमीपणा मी तुझ्यासाठी, आणि मिळवलं काय, तुझं मला प्रत्येक गोष्टीत ग्रँटेड पकडणं?
मला नाही आठवत रे तू कधी माझी अति काळजी केलेली, मला नाही थांबवलस तू कधी घरच्या आणि ऑफिसच्या कामाने पिचून गेलेली बघताना, ना माझी तब्बेत जपायचे सल्ले दिलेस कधी?
ऍक्चुली काय आहे ना, तू तुझ्याकडेच बघत होतास फक्त आणि मी मूर्खही तुझ्याकडेच बघत होते फक्त.
ना तू माझ्याकडे पाहिलं, ना मी माझ्याकडे पाहिलं इतके दिवस.........
म्हणून ठरवलं, आता बस्स झालं तुझं कौतुक!!
अगं पण अंकिता, मला सवय झाली ना तुझ्या तशा वागण्याची. मी ते सगळं मिस करतोय.
हो ना बायकोने पुढे पुढे करणं, आपल्याला अवास्तव महत्व देणं, करणारच रे तू मिस!!
तुला एवढं लागत असेल, वाटलं नाही मला कधी अंकिता?
माझा विचार करत असतास तर वाटलं असतं ना? मी होते अशीच, तुला डिवोटेड बनून बसलेली. तुझ्या एका हाकेला कायम धावणारी..........
आता कसं वाटतंय, कोणी आपल्यासाठी अवेलेबल नसलेलं बघून?
मी अगदी सेम फिल करत होते एवढी वर्ष.......
म्हणूनच कंटाळले आणि ठरवलं, नवरा तर काही केल्या सुधारणार नाही, आपणच सुधारूया. काढून टाकूया त्याच्यावरचा जीव आपला, म्हणजे सर्व आपोआप कमी होईल. नको घेऊया त्याच्या कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट एवढा, की आपलं स्वतःचच महत्व कमी होईल.
एवढं सोप्प नाही ते, पण प्रयत्न करून नक्कीच जमवीन.
तशीही तुला कुठे आहे माझी गरज?
नको ग असं बोलू अंकिता. गरज आहे मला तुझी. असं तोडू नको मला. तू पाठीशी आहेस म्हणूनच मी आहे खरंतर.
हो का? हे आज कळलं मला. तुझं वागणं तर पाठीशी असणाऱ्या माणसाला पार दाबून टाकणार होतं. यापूर्वी कधी दाखवून दिलंस मला, आठवतंय का तुला? शब्दातून नाही की कृतीतूनही नाही. कोणी का असेना प्रत्येकाला कौतुकाची थाप, आपलेपणाचा स्पर्श हवाच असतो. नुसतं ग्रॅंटेड पकडून ठेवणं आणि तुटायला आलं की सावरल्यासारखं करणं, नाही चालत काही!!
आय एम सो सो सॉरी......प्लिज माफ कर. पण ते सगळं पुन्हा चालू कर पहिल्यासारखं. खूप त्रास होतोय मला.
आपल्याकडे कोणी लक्ष देणारं, आपल्याला अतिमहत्व देणारं हातातून निसटत जातंय म्हणून होतोय का त्रास, हर्ष?
नको ग बाई, एवढे कोड्यात टाकणारे प्रश्न विचारुस, मी नाही एवढा तुझ्यासारखा प्रत्येक गोष्टीवर डोकं घासत बसणारा. पण मी सांगतोय ना तुला मी आता तुला जपण्याचा प्रयत्न करेन, तुझं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न करेन. एक चान्स तर दे........असं झटकू नको मला.
जमतंय का बघ. खूप अवघड आहे स्वतःचं सोडून, दुसऱ्याचं मन जपणं, कठीण जाईल तुला. जमवलंस तर ठिक, नाहीतर मी पकडला आहेच रस्ता सुधारण्याचा, मनात आणलं तर कधीही चालू पडेन मी, एकदाही मागे वळून न बघता. मग नंतर कितीही पस्तावलास तरी दुसरा चान्स नसेल, एवढं पक्कं लक्षात ठेव..........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.
Previous article
Next article