प्रेरणादायी
मराठी कथा
स्त्रीवादी
धनदा तिच्या घरातल्या सर्वात आवडत्या जागेत, तिच्या टेरेस गार्डन मध्ये झोपाळ्यावर वाफाळता चहा घेत बसली होती. चहुबाजूने तिने तिच्या आवडत्या फुलांची झाडं लावली होती.
केव्हापासूनचं स्वप्न होतं हे तिचं, कैकवेळा उघड्या डोळ्यांनी बघितलेलं......... पूर्ण झालंच, नव्हे तिने पूर्ण केलंच.
धनदा, तू तर एक साधी मी बरी आणि आपलं घरदार बरं असं समजणारी होतीस. मी तुला अगोदर म्हणायचो, नोकरी कर, तर तूच स्वतःहून नको म्हणायचीस, मी बाहेर पडले तर मुलाचे हाल होतील, तुझे हाल होतील म्हणायचीस.
हे आज विचारावंस वाटलं तुला दुर्गेश? चला म्हणजे, फायनली जागा झालास तू.
तुला असं आरामात बसलेलं बघून खूप जळफळाट व्हायचा माझा. मनात खूप शिव्या घालायाचे तुला.
एक दिवस अशीच तुझ्या नावाने बोट मोडत बसले होते, नशिबाला दूषणं देत होते, मनात सगळ्याच बाजूने नकार घंटा वाजत होती, खूप खूप रडायला येत होतं, तेवढ्यात अचानक आतून आवाज आला, तो नाही करत तर तू कर की मग!! दुसऱ्यांना बोलणं सोप्प, चल तू करून दाखव. स्वप्न आहेत ना तुझी काही, ती तू स्वतःच पूर्ण कर, नवरा करेल अशी अपेक्षाच कशाला?? तूच उठ, आता तुझी बारी आहे समज. त्याला सांगत होतीस ना, ठरवलं तर काही अवघड नाही, आता तूच ठरव आणि तूच बदलून दाखव हे सगळं. नुसतं रडून काय होणार?
माझ्याकडे मार्केटिंग स्किल होती. एखादं प्रॉडक्ट कसं लोकांपर्यंत पोचवायचं याचं अंगभूत कौशल्य होतं माझ्याकडे. मला त्यात इंटरेस्टही होता. लग्नाअगोदर जॉब करायचे तिथेही बरंच काही शिकले होते.
तेच तर जी बाई घर संभाळू शकते ती काहीही करू शकते. वाटतं तितकं सोप्प नाही, एका वेळी दहा गोष्टी हँडल करणं.
मला खरंच माझीच लाज वाटायला लागलीये आता धनदा.
मी ही तुला आणि आपल्या मुलाला नक्कीच काहीतरी करून दाखवेन आता!!
बघ, मी तुला जिंकून दाखवलं........!!
बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०
धनदा तिच्या घरातल्या सर्वात आवडत्या जागेत, तिच्या टेरेस गार्डन मध्ये झोपाळ्यावर वाफाळता चहा घेत बसली होती. चहुबाजूने तिने तिच्या आवडत्या फुलांची झाडं लावली होती.
केव्हापासूनचं स्वप्न होतं हे तिचं, कैकवेळा उघड्या डोळ्यांनी बघितलेलं......... पूर्ण झालंच, नव्हे तिने पूर्ण केलंच.
रोज सकाळी तिला तिचा वेळ इथेच घालवायला आवडायचं. निसर्गाच्या सानिध्यात.......
तशीच बसली होती आजही. चहाच्या घोटाबरोबर गाणं गुणगुणत. तिचा नवरा दुर्गेश तिच्याजवळ येऊन बसला, आणि स्वतःच्या जगात हरवलेली ती काहीशा नाराजीनेच त्यातून बाहेर आली.
आज एवढ्या लवकर दुर्गेशला उठलेलं बघून तिला जरा आश्चर्य वाटलं.
दुर्गेश तिचा हात हातात घेऊन म्हणाला, धनदा आज मला तुझ्याशी खूप बोलायचंय.
खूप प्रश्न आहेत मनात.
धनदा म्हणाली, बोल की मी तुला कधी थांबवलय.
धनदा, तू तर एक साधी मी बरी आणि आपलं घरदार बरं असं समजणारी होतीस. मी तुला अगोदर म्हणायचो, नोकरी कर, तर तूच स्वतःहून नको म्हणायचीस, मी बाहेर पडले तर मुलाचे हाल होतील, तुझे हाल होतील म्हणायचीस.
आणि मग नंतर असं काय झालं, की तू एकदम एवढी उंच भरारी मारलीस. जे मला चांगला पगार होता त्यावेळीही करता नाही आलं, ते तू तुझ्या कर्तृत्ववाने करून दाखवलस? कुठून घेतलीस ही प्रेरणा?
हे आज विचारावंस वाटलं तुला दुर्गेश? चला म्हणजे, फायनली जागा झालास तू.
मी प्रेरणा कुठून घेतली विचारतोयस ना? मी प्रेरणा घेतली तुझ्याकडून!!
काय? माझ्याकडून घेतलीस धनदा?
हो, तुझ्याकडूनच!! एवढा चांगला वेल एज्युकेटेड होतास तू!! पण तुझी एक नोकरी काय गेली, तुझा स्वतःवरचा विश्वासच उडाला. काही दिवस नोकऱ्या शोधल्यास खऱ्या, नंतर तेही प्रयत्न सोडलेस. हळूहळू घरी निवांत बसणं तुला आवडायला लागलं. सतत सगळ्या सिस्टीमच्या नावाने शंख करून तुला तुझ्यापुरतं समाधान मिळत होतं. सेविंग होतं तोपर्यंत सगळं बरं निभावलं. पण हे कुठवर चालणार होतं?
तुला असं आरामात बसलेलं बघून खूप जळफळाट व्हायचा माझा. मनात खूप शिव्या घालायाचे तुला.
तसं तुला हरतऱ्हेने समजावून झालं होतं. पण तुझं मन उचल खातच नव्हतं. माझ्यासाठीही नाही, अन् पोरासाठीही नाही.
एक दिवस अशीच तुझ्या नावाने बोट मोडत बसले होते, नशिबाला दूषणं देत होते, मनात सगळ्याच बाजूने नकार घंटा वाजत होती, खूप खूप रडायला येत होतं, तेवढ्यात अचानक आतून आवाज आला, तो नाही करत तर तू कर की मग!! दुसऱ्यांना बोलणं सोप्प, चल तू करून दाखव. स्वप्न आहेत ना तुझी काही, ती तू स्वतःच पूर्ण कर, नवरा करेल अशी अपेक्षाच कशाला?? तूच उठ, आता तुझी बारी आहे समज. त्याला सांगत होतीस ना, ठरवलं तर काही अवघड नाही, आता तूच ठरव आणि तूच बदलून दाखव हे सगळं. नुसतं रडून काय होणार?
बस्स ते मला पटलं, तू तसाही ऐकत नव्हतास. तुझा आतला आवाज तू मारून टाकला होतास. आणि मला अंधारमय भविष्यात आणखी असंच खितपत पडायचं नव्हतं.
माझ्याकडे मार्केटिंग स्किल होती. एखादं प्रॉडक्ट कसं लोकांपर्यंत पोचवायचं याचं अंगभूत कौशल्य होतं माझ्याकडे. मला त्यात इंटरेस्टही होता. लग्नाअगोदर जॉब करायचे तिथेही बरंच काही शिकले होते.
सुरुवातीला काही छोट्या कंपन्यांमध्ये मार्केटिंग कन्सल्टंट म्हणून फ्रिलान्सिंग करून त्याचा सेल वाढवून दाखवला.
खरंतर, त्यावेळी त्या कंपन्यासुद्धा मला उभं करायला तयार नव्हत्या. पण मला चान्स हवाच होता. अनेकवेळा रिक्वेस्ट करून, अगदी कमी मोबदला सांगून मी अक्षरशः स्वतःला घुसवलं तिथे. आणि मग जिद्दीने त्यांचा पोझीटीव्ह फिडबॅक मिळवला. तू समोर असा लोळत असायचास, आणि मी तुझ्याच लपटॉपवर माझं नशीब बदलवण्यासाठी धडपडत असायचे. त्या छोट्या पोराला कळायचं पण तू मात्र तुझ्या डोळ्यांना झापड लावून होतास.
याच छोट्या कपन्यांनी माझं नाव सजेस्ट करून करून मला मोठं कधी केलं, हे कामात झोकून दिलेल्या मला समजलही नाही. हळूहळू मला हवं ते सगळं मिळायला लागलं. तरी चार वर्ष लागली, तहानभूक हरवून गाडून घेतलं होतं स्वतःला मी. माझा पोरगाही त्याचा तोच शहाणा झाला, त्याचीही प्रेरणा तूच बरं का!! मान मोडेपर्यंत अभ्यास करायला त्याला मी कधीच नाही सांगितलं, त्याला अडवलं तर म्हणायचा, आपण दोघही दाखवून देऊ बाबाला.
पण मग इतकं सगळं असताना, तू मला कसं सोडलं नाहीस, धनदा?
खरं तर हिच गोष्ट मला छळतीये, मी फक्त आराम केला, तू तुझ्या कष्टाने हे दिवस आणलेस. मी तुला मदत करणं सोड, तुझ्यावर अविश्वास दाखवून तुला मागे खेचत होतो. मला खरंच नव्हतं वाटलं, घरादाराला सर्वस्व वाहिलेली तुझ्यासारखी गृहिणी काही मोठं करू शकते. आणि तरीही मी आता तुझ्याबरोबर का आहे?
तेच तर जी बाई घर संभाळू शकते ती काहीही करू शकते. वाटतं तितकं सोप्प नाही, एका वेळी दहा गोष्टी हँडल करणं.
आणि बाईच नाही, मनात एखादी जिद्द निर्माण झाली की कोणीही काहीही करू शकतं. ती व्हायला पाहिजे फक्त.
मी तुलाही हेच सांगायचे, तू कुठे काय ऐकायचास माझं?
राहिली गोष्ट तुला न सोडण्याची. अरे तुझ्यामुळे तर मी इथे पोहोचले. अगोदर काय होते मी? काय अस्तित्व होतं माझं? तू तर जागवलंस मला. अजूनही रोज तुला बघूनच तर वणवा पेटतो माझ्या मनात, आणि मी आणखी उफाळून येते. आणखी जोम चढतो माझ्या अंगात. मी दिवसेंदिवस अधिकाधिक यशस्वी होतीये ते तुझ्यामुळेच. सांगितलं ना तू माझी प्रेरणा आहेस!! तुला कशी सोडू मी?
तू तसा नसतास तर मी अशी झालेच नसते.
मला खरंच माझीच लाज वाटायला लागलीये आता धनदा.
टोचतय मला हे जगणं. तू माझ्यासारख्या हरलेल्या माणसाकडून प्रेरणा घेऊन स्वतःला सिद्ध करून दाखवलस, तर तुझ्यासारख्या जिंकलेल्या स्त्रीकडून प्रेरणा घेऊन मीही नक्कीच यशस्वी होईन, खात्री आहे मला!!
मी ही तुला आणि आपल्या मुलाला नक्कीच काहीतरी करून दाखवेन आता!!
आता तूच मला जागं केलंस धनदा........अगदी कायमसाठी!!
तू मला जिंकून दाखवलस, बघ आता मी तुला जिंकून दाखवणार!!
धनदाने काही न बोलता त्याच्या खांद्यावर विश्वासाने हात ठेवला फक्त...........
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा........
Previous article
Next article