ग, तुम्ही जरा बोलून बघा की.......!!

अगं दिपा, ते बाबा बघ ना काही ऐकतच नाहीत, सांग ना जरा त्यांना. त्यांचं काहीतरी विचित्रच असतं प्रत्येकवेळी. मी त्यांना काय सांगत असतो, आणि त्यांचं काय भलतंच असतं. एक गोष्ट ऐकत नाहीत माझी.

मोहित मला ना तू हे गेले आठवडाभर सांगतोयस, मी काय करू? तुझं नाही ऐकत माझं ऐकणार आहेत का ते?
मी पकले आता तुझी भुणभुण ऐकून. आपण आपल्याबद्दल काही बोलताच नाही हल्ली, सारखं तुझं बाबा बाबाच चालू असतं.

दिपा, गेले फक्त आठवडाभर मी तुझ्याकडे बाबांबद्दल सांगतोय तर तू एवढी वैतागलीस. मी तर गेले चार वर्ष तुझी भुणभुण ऐकतोय ग. सारख्या त्या आईच्या कम्प्लेंटी. तुझी आई अशी, तुझी आई तशी. आज हेच झालं, तिने असच केलं, तिने तसच केलं. 
आठवड्याभराचं सोड, चार वर्षात आपण किती आपल्याबद्दल बोललोय सांग? सारखं तुझं आई, आई चालू नसतं?
इकडे तू माझं आणि तिकडे आई बाबांचं डोकं खात असते. सांग आम्ही करावं तरी काय? म्हणून म्हटलं, आज तुला बाबांबद्दल सांगून बघावं, तू काय करतेस??
वैतागलीसच ना शेवटी? आम्हाला तर तोही अधिकार नाही, जरा दुर्लक्ष करावं म्हटलं, तर लगेच तुमच्या डोळ्यात पाणी आणि तोंडात तो ठरलेला डायलॉग, माझं मेलीचं कुणाला काही पडलेलंच नसतं कधी!!

बाबाही वैतागून गेलेत नुसते. बरं, मी आईला समजावलं, आणि बाबांनी तुला तर ऐकणार आहात का तुम्ही?

अरे मोहित, बोललं की मनाला जरा बरं वाटत ना म्हणून सांगतो रे आम्ही.

दिपा, फक्त मलाच सांगतेस का तू? सगळ्यांना सांगतेस, तुझ्या आईला सांगतेस, मैत्रिणींना सांगतेस. तुझ्याकडेही मेम्बर कमी नाहीत आणि आईकडेही कमी नाहीत.
तरी आम्हाला पकडून पकडून ऐकवत बसता. काय अपेक्षा काय असते तुमची?
त्यापेक्षा तुम्ही समोरासमोर बोलून सोडवत का नाही. तेव्हा खरंतर जास्त बरं वाटेल ना मनाला? कारण एवढ्या सगळ्यांना सांगता तरी मनात धुसपुस राहतेच तुमच्या.
इतरांना सांगण्यापेक्षा एकमेकींनाच सांगा ना. निदान चूका पटल्या तर सुधारता तरी येतील, आणि नाही पटल्या तर निदान नेमक्या माणसाला मनातलं सांगितल्याने मोकळं तरी वाटेल.

मोहित, ऐकून तर घेतलं पाहिजे ना पण समोरच्याने?

दिपा, तू घेतेस? तू घ्यायला लाग तीही घेईल. ती मोठी म्हणून तिला बोलुदे सर्व पहिले, मग तू सुरू हो. पण तुम्ही 
प्लिज एकमेकींशी बोला, आमच्याशी नको. जे काय तुमचे इश्शू असतील ते तेव्हाच सोल्व्ह होतील.

मोहित तू म्हणतोयस म्हणून मी बोलून बघते. तू बोलतोयस ते पटतंय मला. पण समोरासमोर बोलता बोलता त्याचं रूपांतर दुसऱ्या कशात झालं तर याला जवाबदार फक्त तुम्ही बापबेटे असाल हं, सांगून ठेवते.

तसं, झालं तर ते जास्त इंटरेस्टिंग असेल तुमच्या भुणभुणीपेक्षा. आम्ही दोघं तुम्हा दोघींना चिअर अप करू!!
काहीतरी वेगळं, मज्जा येईल.

मोहित, आम्ही कचाकचा भांडायला लागलो ना तर कळेल कशी मज्जा येते ते!!

दिपा, खरं सांगू. मला नाही वाटत तुम्ही भांडाल. तसं असतं तर उगाच आमच्या कानाशी किरकिरत नसता. आणि प्रत्येक प्रश्न भांडून सुटत नाहीत. जे काय असेल ते समोर बोलून मात्र जवळपास सर्व प्रश्न सुटतात. फक्त बोलायचे आणि ऐकायचे गट्स हवेत. सुरू तर करा, आम्ही तुमचं सगळं ऐकून घेणारे आहोत तुमच्या पाठी!!

ठिक आहे मोहित, बोलून बघायला तयार आहे मी.

वा, मस्तच!! आईपण तयार आहे. कालच बाबा बोलले तिच्याशी.
उद्या चांगला दिवस आहे, नेक काम मे देरी नकोच!!
चालेल ना दिपा?

आता तुम्ही बापबेट्याने आमचा काटा काढायचा ठरवलाच आहे तर मी काय बोलणार..... ....??


फोटो साभार: गुगल

©️स्नेहल अखिला अन्वित

कथा आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा........


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel