घनचक्कर😇


मम्मी, त्या चपलांच्या इथे माझी गाडी गेली, दोन- तीन वेळा मी उचलली, तोंडाला पण हात लावून झाला, आता सॅनिटायझर लावू की तू हात धुऊन देतेस?😁
 
करायचं ते केलंस ना? मग करून झाल्यावर हात धुवायचं नाटक माझ्या समाधानासाठी कशाला उगाच?
जा गप खेळ........

म्हणजे आता पुन्हा तोंडाला हात लावला तर चालेल तुला??

अरे पण कार्टूनाss तुला तोंडाला सारखा हात लावून करायचंय काय?🙆

लावू की नको?🤔

नको😏

काsss मी लावणार......🙄

मग विचारतो कशाला? पळ तिकडं😖


थोड्या वेळानंतर.......

मम्मी, ते पार्सल आलेलं ना त्याला चुकून टच झाला माझा हात.😁

थांब दोन मिनिटं, स्वच्छ धुऊन देते.

मम्मी लवकर .....

थांब रे.......

मला नाकाला खाजतय, मी हात लावू शकतो?

काही नाही लावू शकत. उभा रहा गप.😠
डोक्याला ताप झालाय नुसता, नको त्या गोष्टींना टच करायला जातो कशाला? अन् त्याचवेळी बरं नाका-तोंडाला खाजायला येतं तुझ्या?


संध्याकाळी:

मम्मी, पप्पाने मोबाईल सॅनिटाईझ नाही केला घरी आल्यावरssss.......

जाऊ दे तिकडं😏

पण मी आत्ता हात लावला त्याला........😁

काय रे, तुला कोण सांगतं नसते उद्योग करायला?😡

आता तोंडाला हात लावू??😇

काss?? तुला जेव्हा तेव्हा तोंडाला हात लावायचं का पडलेलं असतं? आणि नको त्या गोष्टीला हात लावल्यावर तोंडाला हात लावणं जरुरी का होतं? उगाच ब्लॅकमेल करतो ते.......

जा धुऊन घे तुझ्या पप्पाकडंनच........


आणखी थोड्या वेळानंतर:

मम्मी, ताईने माझी पप्पी घेतलीss.

घेऊ दे की मग.....

कोsरोsना असेल तर????😛

गपे, कोणाला कोरोना नाही घरात sssss

म्हणजे मी आता तोंडाला कधीही हात लावू शकतो?
 
तुझा प्रॉब्लेम काय आहे? का सारखा तोंडाला हात लावायचा असतो तुला?

तूच म्हणतेस ना, कोरोनात तोंडाला हात नाही लावायचा ........

म्हणून काय तुला सारखा लावावासा वाटतो?

होsss

धत् तेरी की🤦 कोरोनापासून घरादाराला वाचवू की तुझ्यापासून स्वतःला वाचवू असं झालंय रे मला आता.......👊

तर मंडळी, आमच्या घरातल्या या पाच वर्षांच्या नक्षलवाद्याचं हे तिरपांगडं वागणं बघून, मला प्रत्येक वेळा ती माकडाची गोष्ट आठवते.
कुण्या साधूने एका तरुणाला ध्यान करताना सागितलेलं असतं की माकडाचा विचार मनात अजिबात येऊ द्यायचा नाही. अगोदर माकडाचा जरासुद्धा विचार न करणाऱ्या त्या तरुणाला, साधूने  मुद्दामहून सागितलं म्हणून, माकड सोडून दुसऱ्या कुणाचा विचार मनात येतच नाही!! सारखं माकडच डोळ्यासमोर दिसत राहतं.

तसंच झालंय अगदी आमच्याकडेही........

हा कोरोना आल्यापासून इकडं हात नको लावू, तिकडं हात नको लावू, तोंडाला सारखा हात नको लावू हे ऐकून ऐकून माझा पोरगा तर ते सर्व करायला भयंकर उतावीळ झालेला असतो नेहमी. कुठेही हात लावल्यावर तोंडाला लावण्यासाठी त्याचे हात शिवशिवत असतात नुसते अगदी!!

कसं असतं ना माणसाचं मन, नाही म्हंटलं, की ती गोष्ट हटकून करावीशी वाटतेच. लहान असो की मोठं, नाही म्हटलं की उत येतोच ज्याला त्याला तेच करण्यासाठी🙃

काय म्हणता, बरोबर ना?

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा.


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel