पालकत्व
मराठी कथा
तूच माझा आरसा ग.....!!
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
मम्मी, मी कशी दिसते?
मम्मी, केस नीट आहेत??
मम्मी, केस नीट आहेत??
सांग ना ?? नीट बघ......
माझ्या मुलीची ही लहानपणापासूनची सवय!!
आता मोठी व्हायला लागलीये तर जरा जास्तच विचारत असते.
घरातून बाहेर पडताना तिचे हे प्रश्न असतातच!!
मला मात्र कधी कधी फार इरिटेट होतं.....
परवाचीच गोष्ट......
असंच कुठंतरी चाललेली, आणि मला विचारतेय, मम्मी बघ ना? सगळं नीट आहे ना??
कशी दिसतेय मी??
कशी दिसतेय मी??
मी कुठल्यातरी कामात होते, तिच्यावर एकदम खेकसलेच, अगं आरसा आहे ना? बघ ना जाऊन, मला का छळतीयेस?
तरी तिने न रागवत पुन्हा तेच विचारलं, नाही तूच सांग, मी कशी दिसतेय? तूच माझा आरसा आहेस मम्मी!!
तिच्या या वाक्यासरशी झटकन माझ्या डोळ्यात पाणी आलं.
मी आरसा?? म्हणजे तिच्यासाठी आरसा जणू एकवेळ खोटं रूप दाखवेल पण मम्मी नाही!!
मी आरसा?? म्हणजे तिच्यासाठी आरसा जणू एकवेळ खोटं रूप दाखवेल पण मम्मी नाही!!
एवढा विश्वास! अगदी भरून पावले मी त्याक्षणी!!
मग मला आठवलं, बरेचदा ती आरशात बघतही नाही आणि मलाच विचारून निघून जाते, मी सर्व व्यवस्थित आहे म्हटल्यावरच तिची खात्री पटते.
हो की, तिच्यासाठी मीच तिचा आरसा आहे!!
बघितलं तर कित्ती साधी गोष्ट, तिच्या निरीक्षणातून तिने मला हा दर्जा दिला असावा का?
खरंच खूप सुखावून गेला तो क्षण मला; किती विश्वास असतो मुलांचा आपल्यावर! ते दाखवतही असतात छोट्या छोट्या गोष्टींतून, पण आपणच समजून घ्यायला थिटे पडतो कधी कधी!!
आपण मुलांकडून नेहमी अपेक्षा ठेवतो, पण त्यांच्याही काही अपेक्षा असतीलच ना आपल्याकडूनही!!
कधी आपण त्याचा विचार करतो का?? आपण मोठे म्हणजे आपल्याला सारं कळतं आणि आपलं सगळं बरोबर हीच धारणा असते बरेच वेळा आपली!!
कधी त्यांच्या नजरेतूनही तोलायला हवं नाही आपण आपल्याला......
माझ्या मुलीच्या वर्गातली तिची एक मैत्रीण बरेचदा शाळेत या मैत्रिणींकडे रडत असते.
तिचं म्हणणं तिची आई सारखी तिच्या बरोबर तिच्या लहान बहिणीला कम्पेअर करते.
लहान बहीण पहिलीत टॉपर आहे, आणि ही आहे आठवीत!!
तिला नाही आवडत असं कम्पेअर केलेलं. ती म्हणते मी माझ्या परीने खूप प्रयत्न करते, पण टॉपर व्हायला नाही जमत मला, काय करू??
कुणाशी कुठलं कम्पॅरिझन??
घरातच असं मानसिक खच्चीकरण होत असेल तर कोणाकडे जावं मुलांनी??
विश्वासाच्या नजरेतून ही मुलं बघतील तरी कोणाकडे?
सहानभूती शोधत भरकटत बसतात मग अशी मुलं, आणि मग आपण हाताबाहेर गेली म्हणून त्यांच्या नावाने खडे फोडत बसतो.
पण त्याची सुरुवात आपणच करून देतो, हे लक्षातही येत नाही आपल्या कधी!!
मुलांच्या गुणदोषांसकट त्यांना सहज स्विकारून, त्यांच्या जीवनातला त्यांच्या हक्काचा आरसा होणं, म्हणजे त्यांच्याबरोबर स्वतःही समृद्धतेच्या वाटेवर चालण्यासारखच आहे, असं मला वाटतं.
तुमचं काय मत??
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि फॉलो जरूर करा आणि शेअर करताना मात्र नावासकट केलात तर फार उत्तम😊
Previous article
Next article
