नखरे क्यों करती है यार........!!

अरे तू अजून इथंच?? घर सोडून जाणार होतीस ना?? - 🤵

तू तरी घरी कसा आलास? सकाळी तर म्हटलेलास ना, आता ऑफिसमधून घरी येतच नाही बस वाजवत!! -🙎

मला वाटलं, एवीतेवी तू गेली असशील, कधी नव्हे ती स्वर्गीय शांतता मिळेल आता घरात - 🤵

ओssह, मलाही वाटलं, एवढा तोऱ्यात बोलून गेलास, तर नक्की कुठे तरी गाडूनच घेशील, मग आपण कशाला उगाच घरातून निघा - 🙎

कशाला आलास ?? - 🙎

तू का नाही गेलीस घर सोडून ?? - 🤵

मूर्ख आहे ना मी म्हणून बसले इथेच - 🙎

मी पण मूर्खच ना म्हणून आलो परत - 🤵

😏 - 🙎

बरं मग आता एक मूर्ख दुसऱ्या मूर्खाशी बोलणार आहे की नाही - 🤵

अजिबाssत नाही - 🙎

ठिक आहे, तशी मी उद्या रजा काढलेली; म्हटलं फॅमिलीला कुठेतरी फिरवून येऊ, सिनेमा दाखवू, शॉपिंगला नेऊ - 🤵

फॅमिलीला अजिबात इंटरेस्ट नाही, जा तुझा तूच - 🙎

नक्की ना?? - 🤵

हो, नक्की - 🙎

चला मग बरं झालं, माझ्या कॉलेजच्या व्हाट्सप ग्रुपवर बघतो, खूप दिवस झाले जुन्या मित्र मैत्रिणींना भेटून, कोणी फ्री असेल तर भेटून घेतो, तेवढाच वेळेचा सदुपयोग - 🤵

🙄 - 🙎

मी आपला फर्स्ट प्रिफरन्स तुला देऊन पहिला - 🤵

गरज नाही - 🙎

बरं, काय जेवायला वगैरे मिळणार का?  - 🤵

नाssही - 🙎

नाही?? मग आताही कोणीतरी कंपनी शोधली पाहिजे डिनर डेटसाठी - 🤵

जा बस शोधत - 🙎

अर्ध्या तासानंतर......

अगं, तू कुठे चालली एवढी नटून थटून ? - 🤵

चालले डिनर डेटला, कॉलेजच्या जुन्या मित्राबरोबर - 🙎

कुठे ''फुलोरा" मधेच ना, माझी मैत्रीण पण तिथेच येणार आहे, मी सोडतो तुला - 🤵

दोघेही हॉटेल बाहेर येतात, दहा मिनिटं थांबतात.

काय गं, कुठाय तुझा टवळा ?? - 🤵

तुझी भवानी तरी कुठं आलीये अजून ?? - 🙎

मग आता निघायचं की ......? - 🤵

तुझी मर्जी !! - 🙎

व्वा!! ती कधीपासून चालायला लागली?? - 🤵

😡 - 🙎

ए, आता बस कर हा तुझे नखरे, दिलमे हाँ और जुबा पे ना - 🤵

😏 - 🙎

तुझा टवळाही मीच आणि माझी भवानीही तूच, कितीही भांडलो तरी, ना तू मला भवानी बदलू देणार ना मी तुला टवळा - 🤵

😍 - 🙎

ते बघ, आपलं आवडतं टेबल वाट बघतय, बुक करून ठेवलय मी केव्हाचं, माझ्या लाडक्या भवानीसाठी - 🤵

तू म्हणतोयस म्हणून हं - 🙎

हो, बाई मी म्हणतो म्हणून, तुला तर अजिबात इच्छाच नव्हती  माझ्याबरोबर डेटला यायची, हो ना?? - 🤵

होच्च् मुळी- 🙎

मग उद्या घरी राहू की जाऊ -🤵

आता एवढा प्लॅन करून ठेवलायस फॅमिलीला हिंडवण्या- फिरवण्याचा तो मोडला तर बरं नाही ना दिसणार - 🙎

अस्सं का?? - 🤵

अस्सच 😘  - 🙍

आता काही दिवसांसाठी तरी यांचं हे अस्सं 👉( 💏 ), आणि काही दिवसांनी परत (🤜🤛) 👈 हे अस्सच !!

चक्र काही थांबणार नाही, ना तुमचं, ना आमचं, ना ह्यांचं!!

हो ना??😅

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार : गुगल

लेख आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा आणि शेअर करताना नावासकटच करा.
Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel