जाने क्या तुने कही..........!!


काय मग, आता वेगवेगळे डेज सुरू झालेत म्हटलं😊 
रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, हग डे , व्हॅलेंटाईन डे .........

हं.... त्यात काय एवढं???🤔

चालेल मला कोणी एखादं फुल बिल दिल तर😍

काय पण ......😏

चॉकलेट बिकलेट आवडतं हा मला अजूनही🍬🍫

लहान आहेस का??

आणि अलगद हात हातात घेऊन "आय लव्ह यु" कोणी म्हटलं तर एकदमच भारी वाटेल मला💕💃

डोक्यावर पडली नाहीयेस ना??  ते आपल्यासाठी नाहीये काही😳

कोणी सांगितलं का तुला असं??😡

अगं, कॉलेजमध्ये आहोत का आता आपण???

कोणाला फुल द्यायला काय कॉलेजमध्येच असावं लागतं का?? रोमान्सला वय नसतंच मुळी कधी!!!
मी घ्यायला तयार आहे तर तुला काय होतंय द्यायला😏
जेव्हा घेत नव्हते तेव्हा मार गुच्छे घेऊन मागे लागायचास😙
आता साधं एक फुल द्यायला जीवावर येतय🙄
कॅडबऱ्या आणि चॉकलेटस खायला घालून घालून डायबेटीस व्हायची वेळ आणलेलीस.....
आता साधी गोळी पण आणावीशी वाटत नाही कधी😭

अगं एवढं काय त्यात?? काहीही घेऊन बसतेस हा तू😊

लग्न झालेलं असलं म्हणून काय झालं; वाटतं रे आम्हाला पण, नवऱ्यानेच का होईना; द्यावं एखादं सुंदरसं फुल.... त्या निमित्ताने का असेना टाकावा मग आपणही त्याच्याकडे एखादा प्रेमभरा कटाक्ष.....😘
जवळ घेऊन थोडसं गुलगुलू करावं, आवडतेस हा अजुनी तू असं हळूच कानात सांगावं.......💏

तेवढंच रुटीन जरा चेंज ना......
जाऊ दे, तुला नाही कळणार .......😪

तो हलवा केलाय तो गिळ😠

गुलाबाचं फुल दिलं तर भरवशील ना?😜

काय?? काय म्हणालास ???

चॉकलेट डे ला Dairy milk नक्की😄

खरंच ??🤗

व्हॅलेंटाईन डे साठी ऍडव्हान्स बुकिंग केलय सिनेमाचं!! 
आहेस कुठे??😆

आम्हाला पण वाटतं हा बायकोबरोबरच का होईना करावं थोडं रुटीन चेंज........हळूच कळी खुलताना तिची बघावी डोळे भरून.........लटकं रागावणं ते, ठेवावं मनात साठवून........हात हातात घेऊन तिचा हलकेच मिठीत ओढावं, गीत मधुर प्रेमाचं, कानात तिच्या गुणगुणावं......

अन् हाय रे, तो प्रेमभरा कटाक्ष..... दिल धडकवतो बरं का अजूनही आमचा😉

आणि फुल नाही, गुच्छच आणलाय आजही 
अगदी तेव्हासारखाच.......💐

खुष 😃

मग रे.......कायच्या काय खुष😁

जाने क्या तुने कही......

जाने क्या मैंंने सुनी..........

बात कुछ बन ही गयी.......😍😘💃


©️ स्नेहल अखिला अन्वित


फोटो साभार : गुगल

Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel